Pratik Patil
कॉलेजविषयी बोलावे म्हंटले तर शब्दही अपुरे पडतील
असे मला वाटते, असे माझे कॉलेज टी. के. कोलेकर कला
आणि वाणिज्य महाविद्यालय, नेसरी. स्टँडपासून १ किमी
अंतरावर व निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे माझे कला
आणि वाणिज्य महाविद्यालय, नेसरी. या कॉलेजमध्ये कला
आणि वाणिज्य अशा दोन शाखा आहेत. पण येथे सायन्स
नसूनही ते सायन्सशी जागा भरून काढते. माझ्या
कॉलेजमध्ये कला आणि वाणिज्य या दोन शाखा आहेत, या
शाखेचे शिक्षक वृंद हे विषय जरी वेगवेगळे असले तरी ते
कोणतेही काम करायचे झाले तर सार्वजण एकत्र व
एकजुटीने काम करतात. त्यांच्यातील ह्या एकजुटीपणामुळे
विद्यार्थीही तसेच आहेत
Navnita Pasare
मला या कॉलेजचा खूप अभीमान वाटतो, इथला शिक्षक
वर्ग खूप चांगला आहे, आणि हे कॉलेज विविध स्पर्धा व
कलागुणांनी भरलेले असून मला हे कॉलेज खूप आवडले.
स्वच्छ व सुंदर आणि ज्ञान मिळवून देणारे हे महाविद्यालय
मला खूप खूप आवडले.
Prajakta Jadhav1
प्रतापराव गुर्जर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्या
नेसरी भागातील तुकाराम कृष्णाजी कोलेकर
यांच्याआशीर्वादाने सुरु असलेले हे माझे महाविद्यालय. एका
विद्यार्थ्यांचे जीवन हा त्याचा गुरु घडवतो. माझ्या
महाविद्यालयातील गुरुही असेच आहेत, प्रत्येक गुरु म्हणजे
सर हे अनमोल रत्न आहेत आणि त्यांच्याकडून आम्हाला
शिक्षण मिळत हे आमच भाग्य आहे. आमच्या कॉलेजमधील
शिस्त, गणवेश ह्या सर्वामुळे ते इतर कॉलेजमध्ये आपला
वेगळेपणा दाखवते. इथं प्रत्येक विद्यार्थी एकलव्य व सरांचा
शब्द म्हणजे द्रोणाचार्य यांचा शब्द मानला जातो.